इंटरनेट फायदे आणि तोटे ( निवड, धोके आणि वापर)

                 इंटरनेट हे हजारो कम्प्युटर्सने आणि कॉम्प्युटर नेटवर्क्सने बनलेले जागतिक नेटवर्क आहे. हे जाळे जगभरातील विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी संस्था तसेच व्यावसायिक संस्थामधील हजारो लाखो संगणक एकमेकांना जोडते. इंटरनेटचा आकार, व्याप्ती आणि डिझाईन वापरकर्त्यांना सामान्य पर्सनल कॉम्प्युटरआणि स्थानिक फोन नेटवर्क द्वारा एकमेकांशी संपर्क साधता येऊ लागला आहे.
इंटरनेट फायदे -
                        1) माहिती लगेच उपलब्द होऊ शकते.
                        2) शिक्षण प्रक्रिया आनंदी, मनोरंजक, आकालानक्षम व परिणामकारक होण्यासाठी इंटरनेटचा वापर करता येतो. 
                      3) इंटरनेटवर विद्यार्त्याना मार्गदर्शनपर साहित्य सहज उपलब्ध होऊ शकते. उदा. लेखी साहित्य, विविध गृहपाठ इ.
                      4) विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी राहुन पूर्ण करण्याची संधी मिळते. उदा. दूरस्थ शिक्षण तसेच मुक्त विद्यापीठ.
                      5) इंटरनेटमुळे शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट असत नाही.
                      6) शैक्षणिक साधननिर्मिती, आधुनिक संदर्भ, माहिती मिळविणे, संशोधन तसेच मूल्यमापन यासाठी इंटरनेटचा वापर करता येतो.
                7) विद्यार्थ्याना स्वयं मूल्यमापन, स्वयंअध्ययन, प्रकल्पासाठी माहिती मिळविणे या कामी इंटरनेटचा उपयोग होतो.
    इंटरनेट तोटे -
                      1) इंटरनेटच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असले तरी त्याचा वापर जबाबदारीने करणे गरजेचे आहे.
                      2) अतिवापरामुळे अनेक बाबींना किंवा अडचणी निर्माण होत आहेत.
                      3) सायबर crime बद्दल ही माहिती नसेल तर चुकीचा वापर होऊ शकतो.
                      4) इंटरनेट मुळे जीवनाविषयीचे आभासी चित्र चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे का, नैराश्य वाढत चालले आहे का अनेक प्रश्नांचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Comments

Post a Comment